कौतुक काशिनाथ बाळे,
आशियाना, कोंब, मडगांव.
भ्रमण ९८५०४५३८७६ गृह्ध्वनी ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale@ymail.com
भ्रमण ९८५०४५३८७६ गृह्ध्वनी ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale@ymail.com
गोवा. ४०३६०१
दि. २८-०७-२०१४
संपादक
दै. नवप्रभा,
दै. नवप्रभा,
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
दै . नवप्रभा मध्ये प्रकाशित करण्यासाठी पत्र पाठवीत आहे. यथायोग्य प्रसिद्धी द्यावी अशी विनंती.
४ . चिन्ह
प्रसिद्ध डॉक्टरची प्रसिद्ध बंगली
आणि त्या बंगलीतील प्रसिद्ध दवाखाना
रस्त्यांच्या तिस्कवर कोपऱ्यात वसलेला
अगदी पहाटे पहाटे पहिला माणूस
उजाडता ही भली थोरली रांग
साग्रसंगीत
तपासणी, अनुमान, औषध, शुल्क
त्याच रस्त्याचा तोच कोपरा
आणि कोपऱ्यातील तो वीज खांब
खांबाच्या आधाराने साडी सुकतेय
काळोख असताना तिने आंघोळ केलीय
गजबजणार असलेल्या रस्त्याशेजारी
मूकपणे सांगतेय
टाइल सभोवतालची ओल
संन्याशाच्या बाबतीत माहित होते
करतल भिक्षा तरुतल वास
इथे साक्षात गृहलक्ष्मी रस्त्यावर
करतल भिक्षा नभतल वास
थोडीशी वेडसर असेल कदाचित
पण माणूसच
ईश्वराचा तोच अंश स्वतात घेऊन वावरणारी
डोळस असतो माणसांना तपासणारा
डोळस नसतो तपासून घेणारा
डोळस होतो उपचार घेतलेला
डोळस करणारा व डोळस होणारा
तिथेच वावरताहेत
त्याच डोळस कोपऱ्यात व्यवहार करताहेत
कोणालाच दिसत नाही
कोणी दाखवत नाही
ती आहे
आई !
समाजपुरुषाचे डोळे तपासायचे चिन्ह
परमेश्वराने माणूसप्राण्यांना डोळस करायला
लावलेले जिवंत डोळस चिन्ह
' पारिजात '
१ . कालबाह्य वारशाचे लाड कमी करा .
गोवा सरकार फोंडा व सासष्टी यांना जोडणारा पूल उभारत आहे . या पुलामुळे शिरोडा व मडगांव यामधील अंतर कमी होणार आहे . याचबरोबर वेळ व इंधन यांची बहुमोल बचत होणार आहे . प्रवाशांचे शारीरिक श्रम कमी होण्याबरोबरच नोकरीच्या नव्या संधीही लोकांना उपलब्ध होणार आहेत . गोवा सरकारने विकासाला सहाय्यभूत ठरणारा हा सेतू लवकरात लवकर पूर्ण करावा .
शिरोडा पुलाचा विषय सुरु झाल्याबरोबर साष्टीतले मुखंड जागे झाले आहेत . आपली ठराविक मसुदा वही उघडून त्यांनी निसर्ग पान उघडे केले आहे . त्यावरील पर्यावरणीय श्लोकाज घोकायला सुरुवात केली आहे . काळोखाचे हे उपासक आणि काय करतील ?
शिरोडा सेतू हि काळाची गरज आहे . घरी जेऊन खाऊन कधीतरी चित्रपट , तियात्र बघण्यासाठी प्रवास करणारा जुना समाज आज बदलला आहे . आज तो चित्रपट , तियात्र घरी बघतो आणि शाकाहारी जेवण्यासाठी सातत्याने भोजनालयात जातो . पूर्वी कुत्रे अंगणात बसून घराची राखण करायचे . आज तेच कुत्रे रस्त्यांवर बसून कचराकुंड्यांचे जतन करताना दिसतात . आता सामाजिक पद्धती बदलल्या आहेत . माणूस आज घरात कमी वाहनात जास्त मुक्काम करताना दिसत आहे . यासाठी दळण वळणाचा विकास व्हायला हवा .
गोव्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . पूर्वी कधीतरी एखादा माणूस दगावायचा आज रोजी एक आहेच असे झाले आहे . यावर उपाय म्हणून रस्ते सुधारणे, वळणे कमी करणे जरुरीचे आहे . त्याचबरोबर रस्त्यावरची वाहने कमी करणे आज अत्यंत आवश्यक आहे . यासाठी पुलाची मदत होणार आहे . ढोंगी पर्यावरणवादी लोकांच्या कालबाह्य झालेल्या वारशाचे लाड कमी होतील तेव्हाच गोव्याचा विकास होईल हि काळ्या दगडावरची रेघ .
कौतुक बाळे