Saturday, 26 July 2014

वर्तमानपत्र बातमी

                             पत्रलेखन वर्ग

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्षिण गोवा प्रचार विभागा तर्फे वर्तमानपत्रे, नियतकालिके , यामधून पत्रलेखन करणारे, पत्रलेखन करू इच्छिणारे यांच्यासाठी एका पत्रलेखन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे . सदर वर्गाचे संचालन समाज कार्यकर्ते व वर्तमानपत्रातून सातत्याने प्रत्रलेखन करणारे श्री. सुभाष सावंत देसाई करतील . गोवा पत्रलेखक संघाचे अध्यक्ष श्री . शशिकांत सरदेसाई प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असतील .

      वर्ग दिनांक १२-१०-२०१४ रोजी ३-३० वाजता सर्वोदय हायस्कूल, कुडचडे येथे घेण्यात येणार आहे . एक जागृत नागरिक या नात्याने समाजातील चांगल्या विचारांना सर्वदूर पोहोचविणे व समाजविघातक गोष्टींवर आवाज उठविणे यासाठी , एक सामाजिक उपक्रम म्हणून या वर्गात आपण सहभागी व्हावे . सहभागाने मी सुद्धा वर्तमानपत्रात पत्र लेखन करू शकतो हा आत्मविश्वास  वाढीस लागेल . वर्गात सराव म्हणून प्रत्यक्ष लेखन करून घेतले जाईल व ती पत्रे वर्तमानपत्रात प्रसिद्धीसाठी दिली जातील . अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करावा .

१. श्री . वासुदेव आडपईकर ९८२३७९९५८९
२. श्री . शिवानंद देसाई  ९४२२४३९७१०
३ . श्री .  सुदेश पैदरकर  ९४२३०५८१०१
                        

                                               हेमंत देव श्रद्धांजली कार्यक्रम  

मडगांव, दि. २८

     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत अनंत उपाख्य बाळ देव  यांचे नुकतेच निधन झाले . त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम उत्कर्ष हायस्कूल रिवण येथे झाला .  गोवा विभाग संघचालक श्री . सुभाष वेलिंगकर, कार्यवाह श्री. संजय वालावलकर, सहकार्यवाह श्री . प्रवीण नेसवणकर दक्षिण गोव्यातील संघ व अन्यान्य संस्थांचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते . 
     सुरुवातीला केपे तालुका संघचालक श्री . आशिष प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविक केले .  उपस्थितांनी एक मिनिट ध्यानस्थ बसून कै . हेमंत देव यांना श्रद्धांजली अर्पण केली . श्री . यशवंत पराडकर यांनी शांती मंत्राचे पठण केले .  त्यानंतर रा . स्व . संघ, उत्कर्ष हायस्कूल, ऋषीवन ग्रामविकास केंद्र, संस्कृती सेवा समिती यांच्या वतीने तसेच व्यक्तिगतरीत्या  श्री . परेश पणशीकर, श्री . गुणेश शिकेरकर, श्री .संजय राउत देसाई, श्री .चंद्रकांत रिवणकर, श्री .सगुण वेळीप, श्री .सुरेश केपेकर, श्री . वल्लभ पराडकर, यांनी आपापली मनोगते व्यक्त केली .  
      प्रमुख संबोधन करताना गोवा विभाग कार्यकारिणी सदस्य श्री . अवधूत कामत म्हणाले, " हेमंत देवांनी केपे तालुक्याचे कार्यवाह म्हणून  अनेक वर्षे काम पहिले . संघकार्याचा वडिलांचा वारसा त्यांनी समर्थपणे पेलला . केपे तालुक्यात संघाचे काम आपल्या अथक परिश्रमाने  वाढविले. त्यांच्या अकाली निधनाने संघाकामाची मोठी हानी झाली आहे . हेमंत देवांच्या कार्याचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करणे व संघाच्या कार्यवृद्धीचे अपुरे राहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल . " कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . दिनानाथ प्रभुदेसाई यांनी केले .        

                           हेमंत देव श्रद्धांजली कार्यक्रम  

मडगांव, दि. २५
     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत अनंत उपाख्य बाळ देव  यांचे ११ जुलै रोजी दुखः द निधन झाले . केपे तालुक्यातील ते ज्येष्ठ संघ कार्यकर्ते होते . मूळ रिवण गांवचे रहिवासी असलेले देव सद्या शिरवई गावात राहात होते . सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ते प्रशिक्षक म्हणून नोकरी करीत होते . संघाचे कार्य करण्यास कठीण अशा केपे तालुक्यात संघाचे काम रुजविण्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता . कसलीही अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य करणे हे कठीणच आणि असे निरपेक्ष काम दीर्घकाळ करणे हि तर तारेवरची कसरत . ' श्रेयाचा मज नको लेशहि, निर्माल्यात विरावे ' असे संघगीतात म्हटले जाते . हेमंत देवांनी संघाचे  काम अंतिम श्वासापर्यंत केले .
      केपे तालुक्याचे कार्यवाह म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पहिले . भरपूर वाचन हे त्यांचे वैशिष्ट्य होते . संघाच्या बौद्धिक विभागात ते नेहमी कार्यरत असत . त्यांच्या अकाली निधनाने संघाकामाची मोठी हानी झाली आहे . हेमंत देवांच्या कार्याचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करण्यासाठी केपे तालुक्याने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आहे . रविवार दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता उत्कर्ष हायस्कूलमध्ये  श्रद्धांजली कार्यक्रम होईल .
   

सा . विवेक आणि रवींद्र भवनने केले सहा पुस्तकांचे विमोचन 

मडगांव, दि. 
     स्वामी विवेकानंद सार्ध शती वर्षाची सुसंधी साधून हीरक महोत्सवी साप्ताहिक विवेक, रवींद्र भवन मडगांव  यांच्या संयुक्त विद्यमाने सहा पुस्तकांचे प्रकाशन केले . अभ्यासू व स्वतः एक साक्षेपी वाचक असलेले गोवा विधानसभेचे सभापती श्री . राजेंद्र आर्लेकर या विमोचन सोहळ्याचे अध्यक्ष होते .  आपल्या भाषणात ते म्हणाले , ' आजच्या काळात प्रसिद्ध होत असलेली लक्षणीय पुस्तके, त्यांचा वाढलेला खप बघता आजही लोक मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचीत आहेत असे दिसते . ' आपल्या विविध कलाप्रेमी आयामांनी रवींद्र भवनाला चैतन्यमयी स्वरूप दिलेले श्री . दामोदर नाईक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते . आपल्या संबोधनात त्यांनी साप्ता . विवेकाला नवनव्या आव्हानांना सामोरे जात त्यावर उपाय शोधून काढायचे आवाहन केले . व्यासपीठावरील  हिंदुस्थान प्रकाशनचे सदस्य  श्री . सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले . साप्ताहिक विवेकाचे गोवा प्रतिनिधी श्री . नितीन देसाई यांनी आभार मानले .  रवींद्र भवनाच्या कृष्णकक्षात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . कौतुक बाळे यांनी केले . 
     साप्ताहिक विवेकच्या ज्येष्ठपर्व व वैद्यराज या मासिकांचे संपादक श्री . रवींद्र गोळे या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते होते . विवेकाच्या ' पुस्तक मित्र ' उपक्रम अंतर्गत प्रकाशित सहा पुस्तकांचा परिचय त्यांनी करून दिला . वंचित आणि उपेक्षित यांच्या जीवनात हास्य फुलविणाऱ्या पथिकांचे दर्शन त्यांनी स्वतः यांनी ' पथिक ' या पुस्तकात केले आहे . आपण कोठे आणि कशासाठी धावतोय याचे भान नसल्याने तणावग्रस्त झालेल्या लोकांना पुस्तक वाचल्यावर क्षणभर तरी हसू फुटावे अशी सदिच्छा डॉ . सतीश नाईक यांनी आपल्या ' तणावमुक्त होऊया ' या पुस्तकात केली आहे . सर्वसामान्य लोकांना कायदेशीर शब्द आणि प्रक्रिया अत्यंत साध्या व सोप्या भाषेत समजाविण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलण्याचे काम विधिद्न्य सरस्वती जाधव-कदम यांनी ' कायदा समजून घेताना ' या पुस्तकाद्वारे केले आहे . डॉ . उषा देशमुख यांनी आपल्या ' त्याचे भविष्य आपुल्या हाती ' या पुस्तकात प्रत्येक मुलांमध्ये असलेली ईश्वरी देणगी ओळखण्याचे आवाहन आईवडिलांना केले आहे . भटके विमुक्तांमध्ये वरकरणी आपल्याला विषमता दिसते . मात्र त्यांमध्ये असलेल्या समान सूत्राचा यशस्वी शोध घेण्याचा प्रयत्न योगिता साळवी यांनी ' जगणे आमुचे असे ' या पुस्तकात केला आहे . स्वाती कुलकर्णी यांनी आपल्या ' आव्हान रक्तलांछित माओवादाचे ' या पुस्तकात तळागाळातील लोकांच्या नावाने त्यांच्याच रक्ताचे पाट वाहणाऱ्या माओवाद्यांचे चित्र उभे केले आहे .
      दूरदर्शन, विविध वाहिन्या, आंतरजाल व भ्रमणभाष यांच्या उदयाने साप्ताहिके, नियतकालिके बंद पडत आहेत. एकांगी विचारांचा वादळी आक्रमक मारा होत असताना समाजाला सावरायचे कसे असा प्रश्न आज समाजधुरीणांना पडला आहे . अशा वेळी साप्ताहिक विवेक सातत्याने पासष्ठ वर्षे नित्यनेमाने प्रकाशित होत आहे . राष्ट्रीय विचारांचा लामणदिवा सतत तेवत आहे . हा दीप असाच रहावा म्हणून अशा प्रकारांच्या पुस्तकांचे प्रकाशन सा . विवेकने केले .
     सा . विवेकाने यापूर्वी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीही कार्यक्रम स्थळी करण्यात आली . आजच्या ज्वलंत सहा विषयांवरील पुस्तकांच्या या प्रकाशनाला विवेकचे वर्गणीदार, हितचिंतक, ज्येष्ठ नागरिक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते .  



सा . विवेक आणि रवींद्र भवन करणार सहा पुस्तकांचे विमोचन 

मडगांव, दि. १९.
     स्वामी विवेकानंद सार्ध शती वर्षाची सुसंधी साधून हीरक महोत्सवी साप्ताहिक विवेक, रवींद्र भवन मडगांव  यांच्या संयुक्त विद्यमाने सहा पुस्तकांचे प्रकाशन करीत आहे . अभ्यासू व स्वतः एक साक्षेपी वाचक असलेले गोवा विधानसभेचे सभापती श्री . राजेंद्र आर्लेकर या विमोचन सोहळ्याचे अध्यक्ष असून, आपल्या विविध कलाप्रेमी आयामांनी रवींद्र भवनाला चैतन्यमयी स्वरूप दिलेले श्री . दामोदर नाईक कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत . साप्ताहिक विवेकच्या ज्येष्ठपर्व व वैद्यराज या मासिकांचे संपादक श्री . रवींद्र गोळे या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते आहेत . शुक्रवार दिनांक २३ ऑगष्टला सायंकाळी ठीक सहा वाजता रवींद्र भवनाच्या कृष्णकक्षात हा कार्यक्रम आयोजित होत आहे .
     दूरदर्शन, विविध वाहिन्या, आंतरजाल व भ्रमणभाष यांच्या उदयाने साप्ताहिके, नियतकालिके बंद पडत आहेत. एकांगी विचारांचा वादळी आक्रमक मारा होत असताना समाजाला सावरायचे कसे असा प्रश्न आज समाजधुरीणांना पडला आहे . अशा वेळी साप्ताहिक विवेक सातत्याने साठ वर्षे नित्यनेमाने प्रकाशित होत आहे . राष्ट्रीय विचारांचा लामणदिवा सतत तेवत आहे . हा दीप असाच रहावा म्हणून अशा प्रकारांच्या पुस्तकांचे प्रकाशन सा . विवेक करीत आहे .
     वंचित आणि उपेक्षित यांच्या जीवनात हास्य फुलविणाऱ्या पथिकांचे दर्शन श्री . रवींद्र गोळे यांनी ' पथिक ' या पुस्तकात केले आहे . आपण कोठे आणि कशासाठी धावतोय याचे भान नसल्याने तणावग्रस्त झालेल्या लोकांना पुस्तक वाचल्यावर क्षणभर तरी हसू फुटावे अशी सदिच्छा डॉ . सतीश नाईक यांनी आपल्या ' तणावमुक्त होऊया ' या पुस्तकात केली आहे . सर्वसामान्य लोकांना कायदेशीर शब्द आणि प्रक्रिया अत्यंत साध्या व सोप्या भाषेत समजाविण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलण्याचे काम विधिद्न्य सरस्वती जाधव-कदम यांनी ' कायदा समजून घेताना ' या पुस्तकाद्वारे केले आहे . डॉ . उषा देशमुख यांनी आपल्या ' त्याचे भविष्य आपुल्या हाती ' या पुस्तकात प्रत्येक मुलांमध्ये असलेली ईश्वरी देणगी ओळखण्याचे आवाहन आईवडिलांना केले आहे . भटके विमुक्तांमध्ये वरकरणी आपल्याला विषमता दिसते . मात्र त्यांमध्ये असलेल्या समान सूत्राचा यशस्वी शोध घेण्याचा प्रयत्न योगिता साळवी यांनी ' जगणे आमुचे असे ' या पुस्तकात केला आहे . स्वाती कुलकर्णी यांनी आपल्या ' आव्हान रक्तलांछित माओवादाचे ' या पुस्तकात तळागाळातील लोकांच्या नावाने त्यांच्याच रक्ताचे पाट वाहणाऱ्या माओवाद्यांचे चित्र उभे केले आहे .
     सा . विवेकाने यापूर्वी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीही कार्यक्रम स्थळी होणार आहे . आजच्या ज्वलंत सहा विषयांवरील पुस्तकांच्या या प्रकाशनाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .