पुस्तक विमोचन
सा . विवेक आणि रवींद्र भवनने केले सहा पुस्तकांचे विमोचन
मडगांव, दि.
स्वामी विवेकानंद सार्ध शती वर्षाची सुसंधी साधून हीरक महोत्सवी साप्ताहिक विवेक, रवींद्र भवन मडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने सहा पुस्तकांचे प्रकाशन केले . अभ्यासू व स्वतः एक साक्षेपी वाचक असलेले गोवा विधानसभेचे सभापती श्री . राजेंद्र आर्लेकर या विमोचन सोहळ्याचे अध्यक्ष होते . आपल्या भाषणात ते म्हणाले , ' आजच्या काळात प्रसिद्ध होत असलेली लक्षणीय पुस्तके, त्यांचा वाढलेला खप बघता आजही लोक मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचीत आहेत असे दिसते . ' आपल्या विविध कलाप्रेमी आयामांनी रवींद्र भवनाला चैतन्यमयी स्वरूप दिलेले श्री . दामोदर नाईक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते . आपल्या संबोधनात त्यांनी साप्ता . विवेकाला नवनव्या आव्हानांना सामोरे जात त्यावर उपाय शोधून काढायचे आवाहन केले . व्यासपीठावरील हिंदुस्थान प्रकाशनचे सदस्य श्री . सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले . साप्ताहिक विवेकाचे गोवा प्रतिनिधी श्री . नितीन देसाई यांनी आभार मानले . रवींद्र भवनाच्या कृष्णकक्षात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . कौतुक बाळे यांनी केले .
साप्ताहिक विवेकच्या ज्येष्ठपर्व व वैद्यराज या मासिकांचे संपादक श्री . रवींद्र गोळे या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते होते . विवेकाच्या ' पुस्तक मित्र ' उपक्रम अंतर्गत प्रकाशित सहा पुस्तकांचा परिचय त्यांनी करून दिला . वंचित आणि उपेक्षित यांच्या जीवनात हास्य फुलविणाऱ्या पथिकांचे दर्शन त्यांनी स्वतः यांनी ' पथिक ' या पुस्तकात केले आहे . आपण कोठे आणि कशासाठी धावतोय याचे भान नसल्याने तणावग्रस्त झालेल्या लोकांना पुस्तक वाचल्यावर क्षणभर तरी हसू फुटावे अशी सदिच्छा डॉ . सतीश नाईक यांनी आपल्या ' तणावमुक्त होऊया ' या पुस्तकात केली आहे . सर्वसामान्य लोकांना कायदेशीर शब्द आणि प्रक्रिया अत्यंत साध्या व सोप्या भाषेत समजाविण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलण्याचे काम विधिद्न्य सरस्वती जाधव-कदम यांनी ' कायदा समजून घेताना ' या पुस्तकाद्वारे केले आहे . डॉ . उषा देशमुख यांनी आपल्या ' त्याचे भविष्य आपुल्या हाती ' या पुस्तकात प्रत्येक मुलांमध्ये असलेली ईश्वरी देणगी ओळखण्याचे आवाहन आईवडिलांना केले आहे . भटके विमुक्तांमध्ये वरकरणी आपल्याला विषमता दिसते . मात्र त्यांमध्ये असलेल्या समान सूत्राचा यशस्वी शोध घेण्याचा प्रयत्न योगिता साळवी यांनी ' जगणे आमुचे असे ' या पुस्तकात केला आहे . स्वाती कुलकर्णी यांनी आपल्या ' आव्हान रक्तलांछित माओवादाचे ' या पुस्तकात तळागाळातील लोकांच्या नावाने त्यांच्याच रक्ताचे पाट वाहणाऱ्या माओवाद्यांचे चित्र उभे केले आहे .
दूरदर्शन, विविध वाहिन्या, आंतरजाल व भ्रमणभाष यांच्या उदयाने साप्ताहिके, नियतकालिके बंद पडत आहेत. एकांगी विचारांचा वादळी आक्रमक मारा होत असताना समाजाला सावरायचे कसे असा प्रश्न आज समाजधुरीणांना पडला आहे . अशा वेळी साप्ताहिक विवेक सातत्याने पासष्ठ वर्षे नित्यनेमाने प्रकाशित होत आहे . राष्ट्रीय विचारांचा लामणदिवा सतत तेवत आहे . हा दीप असाच रहावा म्हणून अशा प्रकारांच्या पुस्तकांचे प्रकाशन सा . विवेकने केले .
सा . विवेकाने यापूर्वी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीही कार्यक्रम स्थळी करण्यात आली . आजच्या ज्वलंत सहा विषयांवरील पुस्तकांच्या या प्रकाशनाला विवेकचे वर्गणीदार, हितचिंतक, ज्येष्ठ नागरिक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सा . विवेक आणि रवींद्र भवन करणार सहा पुस्तकांचे विमोचन
मडगांव, दि. १९.
स्वामी विवेकानंद सार्ध शती वर्षाची सुसंधी साधून हीरक महोत्सवी साप्ताहिक विवेक, रवींद्र भवन मडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने सहा पुस्तकांचे प्रकाशन करीत आहे . अभ्यासू व स्वतः एक साक्षेपी वाचक असलेले गोवा विधानसभेचे सभापती श्री . राजेंद्र आर्लेकर या विमोचन सोहळ्याचे अध्यक्ष असून, आपल्या विविध कलाप्रेमी आयामांनी रवींद्र भवनाला चैतन्यमयी स्वरूप दिलेले श्री . दामोदर नाईक कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत . साप्ताहिक विवेकच्या ज्येष्ठपर्व व वैद्यराज या मासिकांचे संपादक श्री . रवींद्र गोळे या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते आहेत . शुक्रवार दिनांक २३ ऑगष्टला सायंकाळी ठीक सहा वाजता रवींद्र भवनाच्या कृष्णकक्षात हा कार्यक्रम आयोजित होत आहे .
दूरदर्शन, विविध वाहिन्या, आंतरजाल व भ्रमणभाष यांच्या उदयाने साप्ताहिके, नियतकालिके बंद पडत आहेत. एकांगी विचारांचा वादळी आक्रमक मारा होत असताना समाजाला सावरायचे कसे असा प्रश्न आज समाजधुरीणांना पडला आहे . अशा वेळी साप्ताहिक विवेक सातत्याने साठ वर्षे नित्यनेमाने प्रकाशित होत आहे . राष्ट्रीय विचारांचा लामणदिवा सतत तेवत आहे . हा दीप असाच रहावा म्हणून अशा प्रकारांच्या पुस्तकांचे प्रकाशन सा . विवेक करीत आहे .
वंचित आणि उपेक्षित यांच्या जीवनात हास्य फुलविणाऱ्या पथिकांचे दर्शन श्री . रवींद्र गोळे यांनी ' पथिक ' या पुस्तकात केले आहे . आपण कोठे आणि कशासाठी धावतोय याचे भान नसल्याने तणावग्रस्त झालेल्या लोकांना पुस्तक वाचल्यावर क्षणभर तरी हसू फुटावे अशी सदिच्छा डॉ . सतीश नाईक यांनी आपल्या ' तणावमुक्त होऊया ' या पुस्तकात केली आहे . सर्वसामान्य लोकांना कायदेशीर शब्द आणि प्रक्रिया अत्यंत साध्या व सोप्या भाषेत समजाविण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलण्याचे काम विधिद्न्य सरस्वती जाधव-कदम यांनी ' कायदा समजून घेताना ' या पुस्तकाद्वारे केले आहे . डॉ . उषा देशमुख यांनी आपल्या ' त्याचे भविष्य आपुल्या हाती ' या पुस्तकात प्रत्येक मुलांमध्ये असलेली ईश्वरी देणगी ओळखण्याचे आवाहन आईवडिलांना केले आहे . भटके विमुक्तांमध्ये वरकरणी आपल्याला विषमता दिसते . मात्र त्यांमध्ये असलेल्या समान सूत्राचा यशस्वी शोध घेण्याचा प्रयत्न योगिता साळवी यांनी ' जगणे आमुचे असे ' या पुस्तकात केला आहे . स्वाती कुलकर्णी यांनी आपल्या ' आव्हान रक्तलांछित माओवादाचे ' या पुस्तकात तळागाळातील लोकांच्या नावाने त्यांच्याच रक्ताचे पाट वाहणाऱ्या माओवाद्यांचे चित्र उभे केले आहे .
सा . विवेकाने यापूर्वी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीही कार्यक्रम स्थळी होणार आहे . आजच्या ज्वलंत सहा विषयांवरील पुस्तकांच्या या प्रकाशनाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .