उत्सव
१ वर्षप्रतिपदा
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! आज चैत्र शुद्ध प्रतिपदा ! नववर्षदिन ! प्लवनाम संवत्सराचा आरंभ ! आज शालिवाहन शकाचे १९४३ वे वर्ष प्रारंभ होत आहे . विक्रम संवत २०७७ ची सुरुवात होतेय . कलियुगाब्द ५१२३ व्या वर्षाचा शुभारंभ होणार . परमेश्वर निर्मित सृष्टी रचनेचे हे १९७२९४९१२० वे वर्षअसेल . म्हणजेच आज सृष्टी निर्माण होऊन एक अब्ज सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार एकशे एकोणीस वर्षे पूर्ण झालीत व विसावे वर्ष प्रारंभ होतेय . आज पूर्ण मुहूर्त म्हणून पहिला पवित्र दिवस .
महास्फोटात पृथ्वीची निर्मिती झाली . गती स्थिर होत आली . सुरुवातीला पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी होते. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीची स्वप्ने पडायला लागली . निसर्ग निर्मिती करायचीय तर जमीन आवश्यक ! ब्रह्मदेवाने पृथ्वीचा अभ्यास केला . तिला तिरपी केली, विशिष्ट अंशात झुकविले तरच हे शक्य आहे . शुभस्य शीघ्रम ! चांगल्या कार्याला उशीर कशाला ? आणि ब्राह्ममुहूर्ती चित्रा नक्षत्रावर ब्रह्मदेवाने आपल्या ब्रह्मदंडाने पृथ्वीला २३.५ अंशांनी झुकविले. पूर्ण शुभ मुहूर्त असलेल्या आजच्या दिनी पृथ्वीला पाडले, म्हणून पाडवा. संवसार पाडवा . या पृथ्वी जन्मदिनाची याद, आठवण म्हणून वर्षप्रतिपदा .
आजच्या दिवसापासून जमीन, वनस्पती तदनंतर प्राणी व शेवटी मानव यांची निर्मिती करण्यात आली . दोनेकशे कोटी वर्षांचा हा ज्ञातअज्ञाताचा महाविलक्षण प्रवास . या प्रवासातील उपकारकर्त्यांची आठवण म्हणून प्रतिपदा . या दिवशी आपण गुढी उभारतो, ती जाणीवपूर्वक तिरपी ठेवतो . तिरपी गुढी हे त्या ब्रह्मदंडाचे, पृथ्वीच्या झुकलेल्या आसाचे प्रतीक .
गुढी उभारताना ती आपण पाच वस्तूंनी सजवतो . सरळसोट बांबूला नवेकोरे कापड गुंडाळतो ज्या नवीनतेमुळे जीवनात उत्साहाचा संचार होतो . या उत्साहाला आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी गुढीवर कढूनिंबाची डहाळी बांधतो . आरोग्य चांगले असेल तर पुढची वाटचाल सोपी ना ? हि वाट सुगंधी व्हावी म्हणून गुढीला फुलांची माळ अर्पण . वासर सरसर सरावे यासाठी हा वासाचा सर ! त्यावर बत्ताश्याची माला . साखर, मधुरता यांचा गोडवा वाढविणारी . सर्वात वर मुकुटमणी म्हणून चांदीचे भांडे . समृद्धतेचे प्रतीक असलेले .आजच्या दिनी देवळावरचा ध्वज नूतन करायचा . काही प्रांतात घरांघरांवर ध्वज लावतात. ' प्राप्ते नूतन वत्सरे प्रति गृहं कुर्यात् ध्वजारोहणं ! '
नववर्षदिनी आज नवीन पंचांग वाचतात, ज्योतिष्याकडून संवत्सरफल जाणून घेतात . शंकर व पार्वती यांच्या विवाहाची सुरुवात आज झाली. आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मदिनाच्या महोत्सवाची रामलीलेची, चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. रावण वधाच्या ईश्वरीय कार्यानंतर श्रीरामाने आजच्या दिनी अयोध्येत प्रवेश केला . रामाचा राज्याभिषेक आजच्याच दिनी झाला. म्हणूनही आजचा दिवस, रामदिन महत्वाचा . कौरवांचा पराभव केलेल्या धर्मवीर युधिष्ठिराचा राज्याभिषेक पाडव्याला झाला .गौतम ऋषींचा जन्मही आजचा . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे युगपुरुष डॉ. केशव बळीराम हेडगेवारांचा जन्म आज झाला. आज स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. सम्राट विक्रमादित्यांनी शकांना हाकलून लावीत चक्रवर्ती व भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या बलाढ्य साम्राज्याची स्थापना केली आजच्या दिनी केली. शालिवाहनाने मातीच्या सैनिकात प्राण फुंकून, हूणांचा पराभव करून दक्षिण भारतात शक्तीशाली राज्याची स्थापना केली . शीख गुरु परंपरेतील दुसरे गुरु श्री अंगद देव यांचा जन्म आज पाडव्याला झाला . आपल्या सिंध प्रांतातील प्रसिद्ध समाज रक्षक वरुणावर संत झुलेलाल आजच्याच दिवशी प्रकट झाले . सूर्य विषुववृत्तावर येतो यासाठी केरळात याला विषु म्हणतात. युगाचा प्रारंभ म्हणून आंध्र प्रदेशात याला उगादी असे संबोधतात. सिन्धी लोक याला चेटीचंड म्हणतात . आसामात बिहू म्हणतात. बंगालात नॉब बॉर्ष असेही म्हणतात. युगाब्ध,युधिष्ठीर, विक्रम, शालिवाहन शकांची, वर्ष मोजणीची सुरुवात आजच्या दिनी झाली आहे.
आज नव्या ऋतूचे, वसंत ऋतूचे आगमन. निसर्गचक्रातील सर्वांगसुंदर ऋतू वसंत . झाडांच्या नव्या नवेल्या कोमल चैत्र पालवीत बसून अलगद रित्या प्रवेशता होतो. आणि त्या नित नूतन आगमनाचे स्वागत कोकीळ तितक्याच उत्साहाने, आपल्या मंगल कोकीळ कूजनाने करतो. शिशिराची पानगळ, तो निरुत्साह, ती अगतिकता कुठल्या कुठे पळून जाते . आणि एका उत्तुंग उत्साहाचा , प्रचंड पराक्रमाचा , नैष्ठय निश्चयाचा व संपन्न संकल्पाचा पण, प्रतिज्ञा आपण करतो म्हणून आज पाडवा .
पुनश्च सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
२
निसर्ग नवरात्री १
आज नवरात्र !
विजयादशमीने सीमोल्लंघनाने नवरात्रीची सांगता होईल .
थोडे वेगळे वाटले ना !
तिसऱ्या दिवशी बघा.
आज ते गावात आणखी एक अंगुळ वाढलेले दिसेल.
दोन अंगुळे . तुमची पाऊले गवतामध्ये बुडाली ना ?
वा मजेशीर !
अरे वा ! छान ! वावु ! वाव !
निसर्ग नवरात्री २
घटस्थापना करण्यात आली .
बोलणे नको . सांगणे नको . शब्द नकोत . केवळ प्रतीक !
निसर्ग नवरात्री ३
नवरात्र हे फुलांचे दिवस !
फुलायचे दिवस !
माणसाचे तसे निसर्गाचेही .
आजुबाजुला बघा . भरपूर फुले फुललेली आहेत .
वर्षातील सर्वात जास्त .
झाड बघा . फुलांनी ओसंडून वहात आहे .
पानांचे द्रोण भरभरून, आहुती दिल्यासारखी….
ती फुले ते भूमातेला अर्पण करताहे .
जिने दिले तिला परत देताहे .
आणि साधे नाही . सुगंधासह . व्हिथ परिमल .
कोंकणीत मस्त शब्द आहे . परमळ .
गंधासह पसरत पसरत जाणारा .
आसमंत प्रसन्न प्रसन्न करणारा .
थोडा अनुलोम विलोम करू . श्वास स्थिर करू .
हं ! आता घ्या दीर्घ श्वास ! पूर्ण भरा !
बोला ! प्रसन्नता ती हीच ना ….
No comments:
Post a Comment