कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale@ymail.com
ईमेल kautukbale@ymail.com
दि. २६ -०७ -२०१४
संपादक दै. गोवादूत,
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
दै . गोवादूत मध्ये प्रकाशित करण्यासाठी लेख पाठवीत आहे. यथायोग्य प्रसिद्धी द्यावी अशी विनंती.
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लक्ष्य व कार्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हि आज जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना . ' परम् वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं ' आपले हे परमप्रिय, मातृवत राष्ट्र पुनश्च वैभवाच्या शिखरावर जावे हे ध्येय बाळगून काम करणारी . स्वतः ची जाहिरात नाही, कुठेही प्रसिद्धीचा हव्यास नाही . मै नहीं तूही म्हणत सतत चालणारी. डोळ्यांसमोर एकच ध्येय . ' चरैवेती चरैवेती यही तो मन्त्र है अपना | नहीं थकना, नहीं रुकना, सतत चलना, सतत चलना |
संघाचे तृतीय सरसंघचालक कै. बाळासाहेब देवरस यांनी देशभर भ्रमण करताना वेळोवेळी आपल्या भाषणातून संघाचे ध्येय स्पष्टपणे सर्वांसमोर ठेवले . विषयाची सुसूत्र मांडणी, सहज समजणारी अशी सोपी भाषा आणि मार्मिक उदाहरणे यांनी ते श्रोत्यांच्या मनाचा सहज ठाव घेत . आपल्या परखड भाष्यासाठी ते प्रसिद्ध होतेच. आज प्रसार माध्यमांच्या गलबल्यात हे सहा सोनेरी भाषणांचे पाथेय असलेले हे पुस्तक सर्वांनाच उपयोगी पडावे.
संघाचा उद्देश हिंदू समाजाला संघटित करून शक्तिशाली बनविणे हा आहे . हा एक भावात्मक विचार असल्याने समजून घेण्यास तसा तो थोडा कठीण आहेच . ब्रिटिशांचे शासन नष्ट करणे किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाचे शासन आणणे एवढाच तो नाहीए . तर हिंदू समाज एवढा बलवान व्हावा कि त्याला कोणत्याही बाह्य संघटनेची आवश्यकताच पडू नये . शाखाशाखांवर जे सुभाषितांमधून सांगितले गेले, सुसंस्कारित केले गेले, ते म्हणजे स्वयमेव मृगेन्द्रता ! अरे हिंदू ! तू सिंह आहेस ! भारताचा नैसर्गिक राजा आहेस .
एखाद्या राष्ट्राचा मोठेपणा हा त्यांच्या नेत्यांच्या मोठेपणा बरोबरच सामान्य माणसाच्या महानतेवर अवलंबून असतो . सामान्य माणूस किती धैर्यवान, सामर्थ्यशाली आणि महान आहे . त्याच बरोबर एकमेकांशी त्यांचा व्यवहार कसा आहे, ते देशाचा किती विचार करतात यावर त्या राष्ट्राची स्वाभाविक शक्ती दिसून येते . स्वातंत्र्यानंतर सुद्धा जगातील ज्या ठिकाणाचा समाज अधिक जागृत, विकसित आणि संघटित होता त्या ठिकाणी थोड्याशाही प्रयत्नाने अधिक उन्नती झालेली पहायला दिसली .
संघाचे कार्य आज अत्यंत आवश्यक आहे . या कामासाठी किती पिढ्या खर्च पडल्या किंवा भविष्यात किती पिढ्या पडतील हा आपला विषय नाही . तर समाजातील सामान्य माणसाला उभा करण्यासाठी निरंतर काम करणे, हा सामान्य माणूस समाजाभिमुख कसा होईल याचा विचार करणे, प्राचीन हिंदू समाजाचे पोषण या सामान्य समाजाकडून होईल एवढा त्याला संघटित करणे हे संघाचे ध्येय आहे .
समाजात संघाची स्वीकार्यता वाढली आहे . आज लोक संघाचा परिचय करून घेतात, त्याचा अभ्यास करतात. संघाला मदत करतात . संघाच्या कार्यात सहभागी होतात . अशा वेळी संघाचे ध्येय समजून घेणे जरुरीचे आहे . हे पुस्तक या बाबतीत आपल्याला सहकार्य करते . संघाचे काम करणाऱ्या व्यक्तींनी, व्दितीय वर्षाचे संघ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे .
या पुस्तकाला मा . राजा जोशी यांची समयोचित प्रस्तावना लाभली आहे . भारतीय विचार साधनाने प्रकाशित केलेल्या या ७२ पानी पुस्तकाची किंमत ४० रुपये आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेऊ इच्छिणाऱ्या, सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक समाज हितेच्छुने, विशेषतः संघटक लोकांनी हे पुस्तक मुद्दाम वाचले पाहिजे . कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांना सप्रेम भेट द्यावे असे हे संग्राह्य पुस्तक आहे .
नाव :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लक्ष्य व कार्य
वक्ते :- मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस
प्रकाशक :- भारतीय विचार साधना, पुणे
किंमत :- ४० रुपये
पृष्ठ :- ७२
कौतुक काशिनाथ बाळे ,
kautukbale.blogspot.com
दै . गोवादूत मध्ये प्रकाशित करण्यासाठी बातमी पाठवीत आहे. यथायोग्य प्रसिद्धी द्यावी अशी विनंती.
१
कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale@ymail.com
ईमेल kautukbale@ymail.com
दि. १ -०८ -२०१८

No comments:
Post a Comment